बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. पल्लवी जुनघरे(हिंदी विभाग प्रमुख), प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. स्वाती बोरकुटे ई ची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पल्लवी जुनघरे यांनी केले. त्यानंतर हिंदी दिनानिमित्त मान्यवर अतिथीनी कविता, गीत गायन, च्या माध्यमातून हिंदी दिनाचे महत्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यांनी शायरी व नृत्य च्या माध्यमातून आपल्या केलेचे प्रदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. चव्हाण सर म्हणालेत की, 14 सप्टेंबर 1949 रोजी सरकारने हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता प्रदान केली भारतात प्रामुख्याने हिंदी, इंग्रजी व प्रादेशिक भाषा म्हणून राजभाषेला स्थान देण्यात आले आहे जवळपास 40% भूप्रदेशात हिंदी भाषा बोलली जाते. भाषा म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम होय. असे मत व्यक्त केले या निमित्ताने डॉ. पंकज कावरे ग्रंथालय विभाग च्या वतीने हिंदी दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या