बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी महात्मा फुले महाविद्यालयात " राष्ट्रीय सेवा योजना " दिन उत्साहात साजरा " राष्ट्रीय सेवा योजना " दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. भास्कर भगत, सामाजिक कार्यकर्ता, प्रा. डॉ. किशोर चौरे, प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, (राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख), प्रा. डॉ. विनय कवाडे (सहकार्यक्रम अधिकारी रासेयो) यांची विचार मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक मांडताना प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे यांनी एनएसएस चे विद्यार्थ्यांच्या जीवनात काय महत्व असते व यातून एक सामाजिक कार्यकर्ता कसा घडतो याविषयीं आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून मा. भास्कर भगत यांनी राष्ट्रीय सेवा योजना या विभागावर सखोल मार्गदर्शन करतांना एनएसएस च्या शिबिरातून विद्यार्थी कसा तयार होतो त्याच्यात सामाजिक जाणीव जागृती निर्माण होते. ग्राम स्वच्छते बरोबर सामाजिक प्रबोधन होते पुरोगामी विचारवंतांचे विचार हे एक चांगला सामाजिक कार्यकर्ता घडण्यास कारणीभूत ठरतात असे मत व्यक्त केले
आपल्या अध्यक्षीय संबोधनातून प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना केवळ एक विषय नसून यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास घडून येतो राष्ट्रीय सेवा योजनेत शिबिरातील विद्यार्थी हा ग्राम स्वच्छता बरोबर आरोग्य व ईतर घटकबरोबर त्याच्या अंगी असलेल्या कला गुणांना सादर करून त्याचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून आपले कलागूण सादर केले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे शर्मा, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. जयेश गजरे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्या सह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या