चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत टोल फ्री क्रमांक 15100 कार्यान्वीत करण्यात आला आहे. उपरोक्त क्रमांकावर फोन करून आपल्याला कायदेविषयक सल्ला हवा असल्यास तो तज्ज्ञ वकिलामार्फत दिला जातो. या टोल फ्री क्रमांकाचा लाभ भारताचा कोणताही नागरीक सहजपणे घेऊ शकतो. चंद्रपूर जिल्हयातील नागरीकास कायदेविषयक सल्ला हवा असल्यास त्यांने टोल फ्री क्रमांक 15100 वर फोन करावा. त्यानंतर तो राहात असलेले राज्य, जिल्हा व तालुका यांची निवड करून त्याला संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यालय येथील पॅनेलवर कार्यरत असलेल्या वकिलांशी फोनवरून संपर्क करता येवू शकतो. तसेच सल्ला कोणाकडून घेण्याचा आहे? यासाठी महिला किंवा पुरुष वकिल असा विकल्प उपलब्धआहे. उपरोक्त सेवा कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 10 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य नाही किंवा केवळ सल्ला स्वरुप कायदेविषयक माहिती हवी आहे, अशा व्यक्तिंनी उपरोक्त सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या