चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासन व सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयुक्त माध्यमातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने चंद्रपूरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात " संविधान सन्मान महोत्सव " चे 22 सप्टेंबरला आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली, मा. राकेश सिन्हा राज्यसभा सदस्य, ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार, वन, सास्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर वर्धा जिल्हा, मा. डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ मा. डॉ. अनिल हिरेखन, कुलसचिव गो. वि. गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे, डॉ. आंबेडकर अभ्यासन विभाग प्रमुख, मा. अनिरुद्ध वनकर ई ची विचारमंचवर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांना पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली.
यावेळी बोलतांना ना. रामदास आठवले म्हणालेत की, " गोंडवाना विद्यापीठा प्रमाणेच राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयात संविधानाचा जागर व्हायला पाहिजे तसेच लोकशाही ला वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांची नव्हे तर प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत संविधानाचे रक्षण करण्याची हमी दिली " तसेच यावेळी डॉ राकेश सिन्हा यांनी आपले विचार व्यक्त करतांना " भारतीय संविधान ही आपल्याला मिळालेली अमूल्य देण असून यां संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. " यावेळी बोलतांना ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार म्हणालेत की " बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमितून व माझ्या अथक प्रयासातून साकार झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून या चंद्रपूरातून संविधान सन्मान महोत्सव चा जागर होतोय याचा अभिमान असून भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा म्हणजेच मतदानाची सुट्टी व्यर्थ न घालविता मतदानाचा 100% अधिकाराचा वापर करावा व लोकशाहीच्या यशास हातभार लावावा " या वेळी डॉ. श्रीराम कावळे प्र-कुलगुरू यांनी विदयापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती आपल्या मनोगताच्या माध्यमातून केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप बारसागडे तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल हिरेखन, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ यांनी केले. या कार्यक्रमाला सिनेट सदस्य विविध महाविद्यालय चे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी व मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या