वृत्तसेवा :- दसरा आणि दिवाळीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या 8 फेर्या मंजूर केल्या आहेत. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार विशेष म्हणजे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे धावणार पुणे - करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेर्या गाडी क्रमांक 01451 पुणे-करीमनगर विशेष गाडी 28 ऑक्टोबर, 4 आणि 11 नोव्हेंबर रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्ररकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, मंचेरियल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी पहाटे 2 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून 4 फेर्या पूर्ण करेल. करीमनगर - पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेर्या गाडी क्रमांक 01452 करीमनगर- पुणे विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी तसेच 6 आणि 13 नोव्हेंबर रोजी दर बुधवारी करीमनगर रेल्वे स्थानकावरून सकाळी 6 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पुणे येथे गुरुवारी सकाळी 9.45 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून 4 फेर्या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल मिळून 18 डब्बे असतील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या