मानवतेची व निष्पाप जीवांची परवड म्हणजे खैरलांजी हत्याकांड, 18 वर्षानंतरही खैरलांजीच्या जखमा ओल्या असल्याच वाटतंय (The Khairlanji Massacre is a bargain for humanity and innocent lives, even after 18 years, Khairlanji's wounds still feel fresh.)
वृत्तसेवा :- 18 वर्षांनंतरही पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घेणाऱ्या व बाबासाहेबांच्या पडस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या नागभूमी विजयादशमीचा उत्सव साजरा करीत असतांना त्याच विदर्भाच्या भूमितील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी हत्याकांडाच्या जखमा ओल्या आहेत. सुकणारच नाहीत त्या ! अश्वत्थाम्याच्या माथ्यावरील भळभळणारी जखम होय ती !! स्वाभिमानी भोतमांगे परिवारातील सुरेखा, प्रियंका, सुधीर , रोशणची हत्या ही साक्षात मानवतेची हत्या होती. पोलिस बनण्याचं स्वप्न होतं प्रियंकाचं...! गिधाडांनी तिचं स्वप्न सोलून खाल्लं !! मृत्युनंतर तरी भोतमांगे परिवाराला न्याय मिळेल असं वाटलं होतं. पण नाय ! जामिनावर सुटताच गिधाडांचे गावात जंगी स्वागत... मिरवणूक !! दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी झाली. समाधान वाटलं. भैय्यालाल भोतमांगे शेवटच्या श्वासापर्यंत व्यवस्थेकडे भीक मागत हिंडला. पण हरला तो ! तोही अनेक सवाल मागे सोडून गेला !! याचे काय ? हे बुद्धा ! उघड डोळे...!! बघ... काय सुरुय् तुझ्या भूमीत !! बाबासाहेब ! हे संविधानकारा...!! लोककल्याणकारी राज्य म्हणतात ते यालाच का ? समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मानवीय तथा संविधानिक मूल्ये बूकातच बंद आहेत का हो...! कधी घेणार ती मुक्त श्वास ? सांगा ! आपण दोघेही सांगा... "आता रडू कोणा कोणासाठी आहेत कुठे माझ्या डोळ्यात अश्रू कोरड्या पापण्यांतून निघतात विद्रोहाच्या ठिणग्या त्यांनी पेट घेतला तर मी काय करू...?!"
संकलन :- भीमप्रकाश गायकवाड, 'मूकनायक', रविराजपार्क, परभणी
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या