अवैध गोडाऊन वर प्रशासन कारवाई करेल काय? नागरिकांचा सवाल (Will the administration take action on illegal godowns? Question of citizens)
बल्लारपूर :- विद्यानगर वार्डातील 'बेघर जनकल्याण गृहनिर्माण सोसायटी' ही ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांना घर बांधून राहण्यासाठी निर्माण झाली आहे. असे सोसायटीच्या बायलॉमध्ये नमूद असतांना देखील नूतन हार्डवेअर यांनी या सोसायटीमध्ये केवळ कमर्शिअल उपयोगासाठी येथे अवैध गोडाऊन बांधले आहे येथील सुज्ञ नागरिकांनी तशी तीस ते पस्तीस लोकांच्या सह्या घेऊन रीतसर तक्रार न.प.बल्लारपूर यांच्याकडे दि.25/04/2024 ला केली होती परंतु या अर्जाची केवळ थातुरमातुर चौकशी करून त्यांना सात दिवसाच्या आत अवैध गोडावून बंद करावे अशी नोटीस बजावली. परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट पुन्हा या ठिकाणी मोठे मोठे ट्रक अवजड वाहने रस्त्यावरून येत असल्याने चेंबर व नाली वरील पाईपलाईन देखील फुटून रहदारीला त्रास होतो आहे तसेच याचा परिसरात समोर जनता (डेपो शाळा) असल्यामुळे तेथील मुलांना सिमेंटच्या धुळीचा त्रास होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यासोबत व येथील नागरिकांसोबत खेळ खेळू नये ताबडतोब येथील अवैध गोडाऊन हटवण्यात यावे व यावर कारवाई करावी स्वतःला कर्तव्यदक्ष अधिकारी समजणारे प्रशासकीय अधिकारी यावर काय कारवाई करतील की फक्त मृग गिळून चुपचाप बसतील असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणं आहे. तसेच या विषयावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे(प्रेस नोट) केली आहे. या संदर्भात संबंधित विभागात माहिती घेतली असता कारवाई सुरु असल्याचे म्हटले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments