मूल शहरात होणार एसटीचे आगार, एसटी आगारासाठी 20 कोटी रु मंजूर (ST Agar to be held in Mul city, Rs 20 crore sanctioned for ST Agar)

Vidyanshnewslive
By -
0
मूल शहरात होणार एसटीचे आगार, एसटी आगारासाठी 20 कोटी रु मंजूर (ST Agar to be held in Mul city, Rs 20 crore sanctioned for ST Agar)


चंद्रपूर :- नागरिकांना दळणवळणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी गेल्या 40 वर्षांपासून मूल येथे आगार व्हावे, याकरिता मूलवासीयांचा संघर्ष सुरू होता. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली. चंद्रपूर-गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मूल शहरात बस आगाराच्या निर्मितीसाठी अखेर 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी 10 कोटींचा निधी प्राप्त झाल्याने अखेर 40 वर्षांच्या संघर्षानंतर मूल आगाराचा प्रश्न निकाली निघणार आहे. मूल येथे उत्पादित होणारा तांदूळ देशातील अनेक राज्यांत जात असल्याने दळणवळणासाठी येथील मार्ग परिचित आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या मध्यभागी असणारे हे शहर व्यापारी दृष्टिकोनातून सकारात्मक असल्याने दळणवळणाला वाव आहे. दरम्यान, चिमूर आगर झाले. मात्र, मूल आगाराचा प्रश्न कायमच होता. जास्त महसूल देणारा तालुका म्हणून शासनदरबारी नोंद आहे. शेकडो प्रवाशांचे आवागमन असणाऱ्या येथील बसस्थानकात गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच ब्रह्मपुरी, चिमूर आगारातील बस प्रवाशांना सेवा पुरवीत असतात. एखाद्या वेळेला मार्गात बस बंद पडल्यास बदली बसकरिता गडचिरोली अथवा चंद्रपूर आगाराकडूनच बस मागवावी लागते. यात प्रवाशांच्या वेळेचा खेळखंडोबा होतो. त्यामुळे मूल येथे आगाराची नितांत गरज आहे. बसस्थानकातून दरदिवशी सुमारे 630 बसफेऱ्या होत असतात. दररोज शेकडो प्रवाशांचे आवागमन असणाऱ्या येथील बसस्थानकात गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच ब्रह्मपुरी, चिमूर आगारातील बस प्रवाशांना सेवा पुरवीत असतात. एखाद्या वेळेला मार्गात बस बंद पडल्यास बदली बसकरिता गडचिरोली अथवा चंद्रपूर आगाराकडूनच बस मागवावी लागते. यात प्रवाशांच्या वेळेचा खेळखंडोबा होतो. त्यामुळे मूल येथे आगाराची नितांत गरज आहे. मूल येथे बस आगार होण्यासाठी मागील 40 वर्षांपासून नागरिक संघर्ष करीत होते. आगारासाठी जागाही आरक्षित आहे. आगारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष घातल्याने १० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच आचारसंहितेपूर्वी कामाला सुरवात होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)