बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अस्थायी रेल्वे कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्या अन्यथा काम बंद आंदोलन, भाजप कामगार मोर्चाचा इशारा (Pay full salary to temporary railway employees at Ballarshah railway station or else stop work, warns BJP worker morcha)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या अस्थाई स्वरूपात कार्य करणाऱ्या 80 पाणी व सफाई कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार पूर्ण वेतन देणे अपेक्षित आहे व या संदर्भात कामगारांनी मागणी केली आहे अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी दिला आहे रेल्वेच्या नियमानुसार कामगारांना 522 रु. रोजी देने आवश्यक आहे. परंतु केवळ 320 रुपये रोजी प्रमाणे पगार देण्यात आला आहे, जो पूर्णत: बेकायदेशीर आहे. कामगार नेते अजय दुबे यानी या विषया वर मोहित मंडलेकर सीनियर डिविजनल मेकेनिकल इंजीनियर मध्य रेलवे नागपुर यांच्याशी फोन वर चर्चा केल्यावर कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)