जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन, विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक, मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन (Organized employment fair on 23rd August on behalf of collector office, students will get trainee appointment, appeal to attend in large numbers)
चंद्रपूर :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय/ निमशासकीय आस्थापना, खाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रांतर्गत खाजगी / सार्वजनिक आस्थापना/ कंपन्या/ उपक्रम / संस्था येथे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्याकरीता 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 1) 12 वी पास विद्यार्थांना प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, 2) आय टि आय / पदवीधर प्रतिमाह विद्यावेतन 8 हजार तर 3) पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थांना प्रतिमाह 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. करीता 12 वी पास, आय टी आय, कोणत्याही शाखेची पदवीका कोणत्याही शाखेचा पदविधर / पदव्युत्तर उमेदवारानी त्यांचे शैक्षणिक पात्रता सिध्द करणा-या मुळ प्रमाणपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments