चंद्रपूर : लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था चंद्रपूर व जयभीम संमेलन समिती चंद्रपूरच्या वतीने ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम संमेलन चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारिक, लोककलावंत, जलसाकार, नाटककार, वक्ते, मंत्री, खासदार, आमदार, चळवळीतील कार्यकर्ते, नेते, कवी तसेच आयएएस अधिकारी असे वेगवेगळ्या विषयांचे स्कॉलर्स एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने बौद्धिक मेजवानीचा अनोखा मेळा चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवार, ३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे तर उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, विशेष मार्गदर्शक म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजेंद्रपाल गौतम, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार बळवंत वानखेडे, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सुभाष धोटे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक अनिरुद्ध वनकर यांनी दिली.
शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ वाजता जयभीम कवी संमेलन, रात्री ८:४५ वाजता जयभीम आंबेडकरवादी जलसा सादरकर्ता गायिका सुषमा देवी (कुंकू लावीलं रमानं फेम), गायक रविराज भद्रे, धम्मजीत तिगोटे जलसा सादर करणार आहेत. रविवार, १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जयभीम विद्रोही गिते: राहुल सूर्यवंशी, निशा धोंगळे, सायं. ६.३० वाजता 'भारतीय लोकशाही जपण्यासाठी निवडणूक आयोग, मीडिया व मतदारांची भूमिका' यावर जयभीम परिसंवाद, रात्री ७.१५ वाजता 'व्हय मी सावित्री बोलतेय' एकपात्री नाटक, रात्री ७.३० वाजता जयभीम रत्न पुरस्कार व समारोपीय समारंभ. रात्री ९.१५ वाजता जयभीम बुद्ध भीम गीतांचा महाजलसा सादरकर्ते गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कडूबाई खरात, मंजुश्री शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments