पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यअंतर्गत बदल्या (Transfers of 27 police officers of the rank of Police Inspector, Sub-Inspector and Assistant Police Inspector within the district)

Vidyanshnewslive
By -
0
पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यअंतर्गत बदल्या (Transfers of 27 police officers of the rank of Police Inspector, Sub-Inspector and Assistant Police Inspector within the district)


चंद्रपूर :- विधानसभा निवडणूक व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा नुकताच दौरा झाला होता. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बुधवारी (दि. २९) पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याचे आदेश जारी केले. या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार जिवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांची कोरपना येथे बदली झाली. त्यांच्याजागी जिल्हा विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांची ठाणेदारपदी वर्णी लागली आहे. जिवती ठाण्याला पहिल्यांदाच महिला पोलिस ठाणेदार मिळाल्या आहे. घुग्घुस ठाण्याचे दुय्यम अधिकारी प्रदीप पुल्लरवार यांची सावली ठाणेदारपदी तर, रामनगर ठाण्याचे दुय्यम अधिकारी रमाकांत कोकाटे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गुहे यांची उमरी पोतदार ठाणेदारपदी, तर उमरी पोतदार येथील योगेश हिवसे यांची पडोली ठाणेदारपदी वर्णी लागली. नियंत्रण कक्षातील प्रवीण सोनुने यांची रामनगर येथे तर बल्लारपूर पोलिस ठाण्यातील दीपक कांकेडवार यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. १५ दिवसांपूर्वी ५० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र आता पुन्हा ४ पोलिस निरीक्षक, १३ सहायक पोलिस निरीक्षक व १० पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांनी आवडीचे ठाणे मिळावे, यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र काहींचा हिरमोड तर काहींचे समाधान झाल्याची प्रशासनात चर्चा आहे.
              नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक पंकज गजानन वाघोडे यांची टेकामांडवा येथे ठाणेदारपदी, सहायक पोलिस निरीक्षक शरद श्याम भस्मे (वरोरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय निशांत भीमराव फुलेकर (वरोरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय पंकज अशोक बैसाणे (चंद्रपूर सिटी), नियंत्रण कक्षाचे एपीआय हेमंत शंकर पवार (राजुरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय राजेंद्र देवीदास गायकवाड (बल्लारपूर), नियंत्रण कक्षाच्या एपीआय शीतल पवन खोब्रागडे (ब्रह्मपुरी), चिमूर येथील एपीआय प्रमोद रासकर (पाथरी ठाणेदार), पाथरी येथील ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तळोधी ठाणेदारपदी वणी लागली. टेकामांडवा येथील पोलिस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार (बल्लारपूर), वणी कॅम्पचे पीएसआय हिराचंद गवारे (रामनगर), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पाटील (भिसी), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ देवाजी ठवकर (सिंदेवाही), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते (बल्लारपूर), नियंत्रण कक्षातील तृप्ती खंडाईत (चंद्रपूर शहर), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर ठाणेदार (वणी कॅम्प), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मनोजकुमार रघुनाथ नाले (ब्रह्मपुरी), बल्लारपूर येथील पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम (मूल), चिमूरचे पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे यांची (वरोरा) येथे बदली करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)