बल्लारपूरच्या साहित्यिक पवन भगत यांची " ते पन्नास दिवस " कादंबरीचा अहमदनगरच्या स्वायत्त महाविद्यालयाने केला अभ्यासक्रमात समावेश ("Te Panas Divas" novel by Ballarpur writer Pawan Bhagat has been included in the syllabus of Ahmednagar Autonomous College)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरच्या साहित्यिक पवन भगत यांची " ते पन्नास दिवस " कादंबरीचा अहमदनगरच्या स्वायत्त महाविद्यालयाने केला अभ्यासक्रमात समावेश ("Te Panas Divas" novel by Ballarpur writer Pawan Bhagat has been included in the syllabus of Ahmednagar Autonomous College)
वृत्तसेवा :- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज, (स्वायत्त) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्टस, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. कोरोनाच्या संक्रमन काळात नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागला या काळात घडलेल्या माणसाच्या जीवन मरणाच्या यातनातून घडणाऱ्या परिस्थितीचे वर्णन या कादंबरीतुन करण्यात आले आहे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये व ज्ञानप्राप्ती होणे तसेच विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी भारतातील लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण शिक्षण व संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षणप्रणालीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना, विद्यार्थीकेंद्री, आंतर्विद्याशाखीय, रोजगाराभिमुख, कौशल्याधिष्ठीत असे भाषा व साहित्याचे अभ्यासक्रम निर्माण करणे गरजेचे आहे.
साहित्यिक क्षमता, भाषिक क्षमता वाढीसाठी, जीवनाच्या आकलनासाठी आणि प्रगल्भतेसाठी विद्यार्थी सिद्ध करणे; ही आजची गरज बनली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मराठी विषयातील पदवी वर्गासाठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आपल्या 'ते पन्नास दिवस' या कादंबरीचा आपण दिलेल्या मान्यतेनुसार समावेश करण्यात आला आहे. आपल्या लेखनातून विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या कादंबरीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागेल. अशा प्रकारची माहिती प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे विभाग प्रमुख मराठी विधाम व संशोधन केंद्र भू आर्टस, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)