अतिवृष्टीमुळे 22 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालय बंद, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित. (Due to heavy rains, all Anganwadis, pre-primary, primary schools, schools and colleges in the district were closed on July 22.)

Vidyanshnewslive
By -
0
अतिवृष्टीमुळे 22 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालय बंद, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित. (Due to heavy rains, all Anganwadis, pre-primary, primary schools, schools and colleges in the district were closed on July 22.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात दि. 19 व 20 जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने व अनेक गांवाना पुराचा वेढा पडल्याने जनजिवन विस्कळित होण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 21/07/2024 व 22/07/2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2024 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपतकालीन परिस्थितीत खालील दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र. 07172 250077 /
07172 272480

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)