भारतीय संविधान प्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हा - मा.नभा वाघमारे. (Participate in the work of Indian Constitution Enlightenment - Hon. Nabha Waghmare.)

Vidyanshnewslive
By -
0
भारतीय संविधान प्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हा - मा.नभा वाघमारे. (Participate in the work of Indian Constitution Enlightenment - Hon. Nabha Waghmare.)


बल्लारपूर :- सर्व सामान्य लोकांपर्यंत भारतीय संविधानातील अधिकारांची जाणीव, जागृती करून त्यातील अनुच्छेदांची भारतीय संविधानातील लोकांच्या अधिकारांची जागृती करण्यासाठी दि.14/7/24 ला सायं. तथागत बुद्ध विहार, विद्यानगर येथे कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम बामसेफ द्वारे संचलित (BS-4) बि.एस.फोर अर्थात भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा व संवर्धन या देशव्यापी संघटने मार्फत संपन्न झाला. मुख्य वक्ता मा.नभा वाघमारे चंद्रपूर तर याप्रसंगी मा.जि.के. उपरे माजी मानद सचिव सिडीसिसी बॅंक, मा.देवानंद रायपुरे, जिल्हाध्यक्ष बामसेफ, मा.महेंद्र खंडाळे संविधान, प्रबोधक, मा.संदिप वाघमारे, संविधान प्रबोधक, उपस्थित होते. मा.नभा वाघमारे यांनी आपल्या सुंदर गायन शैलीत विविध गितांमधुन भारतीय संविधानातील विविध अनुच्छेदांचा अर्थ समजावून सांगितले. त्यात लोकांचे देशातील सर्व जाती समुहाचे व महीलांचे हक्क व अधिकार कसे सुरक्षित केले आहेत व त्यांचे परिणाम यांवर सुंदर विवेचन करून समजवून सांगितले. भारतीय संविधानाची जनजागृती करण्यासाठी संविधान प्रबोधक म्हणून कार्य करण्याचे उपस्थितांना आहवान केले. प्रास्तविक मा.रायपुरे यांनी केले. मा.जि. के.उपरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता माता रमाई मंडळ व तथागत बुद्ध विहार यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मा.भसारकर मॅडम, मा.सुकेशना मेश्राम, अनिता मून, एड्.पवन मेश्राम, एड्.वाघमारे, मा.संतोष बेताल, केशवराव खोब्रागडे, ताराचंद थुल व सर्व मंडळाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)