साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन (Call for applications for the Sahitya Ratna Lokshahir Annabhau Sathe Scholarship)

Vidyanshnewslive
By -
0
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 
शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन (Call for applications for the Sahitya Ratna Lokshahir Annabhau Sathe Scholarship)


चंद्रपूर :-  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामंध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उर्त्तीण झालेल्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2024 आहे. सदर शिष्यवृत्ती करीता पोटजात असलेले मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग मागंमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारुडी, मांगगारोडी, मादगी, मादीगा या जातीतील विद्यार्थी विद्यार्थींनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. अर्ज भरण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क करून मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत किंवा चंद्रपूर जिल्हा कार्यालयाच्या slasdcchandrapur@gmail.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे. आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखला, फोटो, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)