मोठी बातमी ! महाराष्ट्र व राजस्थान चे नवीन राज्यपाल नियुक्ती, सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या तर हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती (Big news! Appointment of new Governors of Maharashtra and Rajasthan, C. P. Radhakrishnan appointed as Governor of Maharashtra and Haribhau Bagde as Governor of Rajasthan)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं परिपत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलंय. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले  तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले. ते कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता.
हरिभाऊ किसनराव बागडे - राजस्थान, संतोषकुमार गंगवार - झारखंड, रमण डेका - छत्तीसगडसी. एच. विजयशंकर - मेघालय, ओमप्रकाश माथूर - सिक्किम, गुलाबचंद कटारिया - पंजाब, चंडीगड, 
लक्ष्मण प्रसाद आचार्य - आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार), जिष्णू देव वर्मा - तेलंगण
के. कैलाशनाथन - पुदुच्चेरी (उप राज्यपाल)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)