अबब ! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये आढळला चक्क साप (Abba! A snake was found in the shirt of a gypsy driver in Tadoba-Andhari Tiger Reserve)

Vidyanshnewslive
By -
0
अबब ! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकाच्या शर्टमध्ये आढळला चक्क साप (Abba! A snake was found in the shirt of a gypsy driver in Tadoba-Andhari Tiger Reserve)


चंद्रपूर :- साप कुठेही दिसला किंवा त्याचं नावं ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र, पावसाळ्यात अनेकदा सापाबद्दलच्या वेगवेगळ्या घटना समोर येतात. यात काहीवेळा साप अगदी घरात येऊन बसलेला दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील आहे. जिप्सी चालक यांच्या शर्टमध्ये साप लपून होता. जेव्हा ते सफारीसाठी तयारी करत होते. त्यांनी शर्ट परिधान केल्यानंतर त्यांना हालचाल जाणवली होती. त्यांना साप असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांच्या सर्प मित्रांनी हा साप शर्टांतून बाहेर काढला. ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली. चक्क वाहन चालकाच्या शर्टमधून साप निघाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे बोललं जात आहे. प्रमोद गायधने असं जिप्ती चालकाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया केल्या आहेत. एकाने लिहले आहे की हा पान दैवत सर्प आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)