धक्कादायक ! आनंदवन येथील युवतीच्या हत्येप्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Shocking! An incident in which the accused committed suicide by hanging himself in the case of the murder of a young woman in Anandvan)
वरोरा :- वरोरा येथे 26 जुन रोजी आरती दिगांबर चंद्रवंशी या युवतीची हत्या झाली हत्या झाली होती. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी समाधान माळी नामक युवकाला अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. मात्र आरोपीने पोलीस कस्टडीत असतांना त्याने फासी लावून आत्महत्या केली. यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. आनंदवन येथे चार दिवसापूर्वी घडलेल्या युवतीच्या खुनातील आरोपी समाधान माळी याने वरोरा पोलिसांच्या ताब्यात असताना आत्महत्या केली आहे आरोपी समाधान माळी पोलिस कोठडीत असतानाच आज रविवारी त्याने कोठडीत बुटाच्या लेसणे त्याने आपले जीवन संपवले. प्रेमप्रकरणातून प्रियसीची हत्या केल्यानंतर आज त्याने स्वतः जीवन का केली? याचे कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या