बल्लारपूर रेल्वे चौक परिसरात दारूची तस्करी करतांना दोघांना अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Two arrested while smuggling liquor in Ballarpur Railway Chowk area, Ballarpur police action)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर रेल्वे चौक परिसरात दारूची तस्करी करतांना दोघांना अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Two arrested while smuggling liquor in Ballarpur Railway Chowk area, Ballarpur police action)
बल्लारपूर :- लोकसभा निवडणुकीचा पावभूमीवर आदर्श आचार संहिता सुरु असतांना अवैधरीत्या दारुचा साठा बल्लारपुर येथून तेलंगाणा येथे रेल्वेनी घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केले. बल्लारपुर पोलीसांना माहिती मिळाली की २ एप्रिल रोजी रात्री रेल्वे ने दारू घेउन जाणार आहेत. रात्री २ वाजता ते २.४५ वाजता चे सुमारास रेल्वे चौक, चल्लारपुर येथे कारवाई करत पवन लालु घुगलोत (२२), धंदा-मजुरी,लालु पंतलु घुगलोत (५२) वर्षे दोन्ही रा. शिवनगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.३२५/२०२४ कलम ६५ (अ), ८३ महा.दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून लाल रंगाच्या बॅगमध्ये एकुण-१४ नग रॉयल स्ट्रॅग डिलक्स व्हिस्की प्लॉस्टीक बॉटल, प्रत्येकी २ लिटर प्रमाणे विदेशी दारु त्यांचे बेंच क्रं. ३६१५ ११ फेब्रुवारी २०२४ असे लेबल लागलेली प्रत्येकी कि. १ हजार ८५० रु. प्रमाणे कि.अं. २५ हजार ९०० रु., निळ्या रंगाच्या बॅग मध्ये एकुण-२०० नग देशी दारु रॉकेट संजा प्रत्येकी १० एम.एल. भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत प्लॉस्टीक शिशा प्रत्येकी कि.अं.३५/-रु. कि.अं. ५ हजार रु. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली जुनी वापरती काळ्या रंगाची हिरो मायस्ट्रो मोपेड के. MH 34 81 3591 कि.अं. ३५ हजार रु. असा एकुण- ६७ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला असून ते जप्त करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक  मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे  उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पोहवा संतोष दंडेवार, पो.अं. गणेश पुरडकर यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)