सट्टा' बाजारातील उलाढाल चर्चेत.....! 'विरोधी लॉट' असल्याचे संकेत? सत्ता पर सट्टा ('Satta' market turnover in discussion.....! An indication of being an 'anti-lot'? Speculation on power)

Vidyanshnewslive
By -
0
'सट्टा' बाजारातील उलाढाल चर्चेत.....! 'विरोधी लॉट' असल्याचे संकेत? सत्ता पर सट्टा ('Satta' market turnover in discussion.....! An indication of being an 'anti-lot'? Speculation on power)
वृत्तसेवा :- 'एक्सिट पोल' वर बंदी आहे. का घेतली गेली हा सस्पेन्स कायम आहे. मात्र लोकशाहीचा उत्सव साजरा करणारी देशातील १४४ कोटी जनता लोकसभा निवडणुकीला धरून एवढी' एक्साइटेड' आहे की कुठल्यातरी माध्यमातून आपल्या मतांची गोळाबेरीज करीत असते. १९ एप्रिलला देशातील १०२ लोकसभा क्षेत्रात मतदान झाले व मतदानानंतर नेहमीप्रमाणे जो 'सट्टा' चालला ते बघता सरकार विरोधी लाट सुरू आहे का? हा सवाल सुरू झाला आहे. जानकार बोलतात की जेव्हा लाट सुरू होते तेव्हा कुणाची गय नसते. विरोधी लाट परिवर्तनासाठी असते व यात प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावर बदलाची अपेक्षा जनतेची असते. यात स्थानीक कार्यशील उमेदवारांना सुद्धा फटका बसतो हे भूतकाळात अनेकदा बघायला मिळाले आहे.
        सुधीर भाऊ मुनगंटीवार विकासपुरूष मानले जातात. मात्र निवडणुकीनंतर जो सट्टा बाजार चालला ते बघता जनतेने मत कुणाविरोधात दिले हे बघून संभ्रम निर्माण होतो. कळायला वाव दिसत नाही पण सट्टा बाजारात
निवडणुकीनंतर जे भाव चालले ते बघता' विरोधी लाट' सुरू असल्याची ओरड ड सुरू सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे. अशी वाट सुरु असेल तर संपुर्ण भारत या विरोधी लाटेवर स्वार होऊन प्रस्थापिताची वाट लावेल का? हा सवाल उपस्थित होताना दिसतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सट्टा मार्केट ने जो कोल दिला आहे तो धक्कादायक असल्याचे बोलले जाते. प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सट्टा बाजारात कांग्रेस उमेदवारांचा भाव ७० ते ७५ असल्याचे कळते. चचैनुसार कांग्रेस उमेदवारांकडून एवढे ग्राहक पुढे आलेत की शेवटी सट्टा किंग असणाऱ्यांनी सट्टाघेणे बंद केल्याचे वृत्त आहे.
            चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील झालेले मतदान व तदनंतर सटटा बाजारातून जे उपद्रवमुल्य गृहीत धरले गेले ते बघता कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाची आशा स्थिरावलेली दिसते. सट्टा बाजारातील भाव समजणे जटील असते असे बोलले जाते. मात्र मोठा वर्ग यातून विजयाची माला कुणाच्या गळयात पडेल याचा कयास चालविला जातो. भा.ज.पा.उमेदवार मुनगंटीवार ना. यांच्या विकास कामाबाबत वा राजकिय चाणाक्षते- बाबत शंका नसताना विजयाची माला प्रतिभा धानोरक यांचेकडे सरकत असेल तर मग जाणकारांनी याकडे मोदी विरोधी लाट म्हणून बघीतले काय ? हा विषय चंद्रपूर लोकसभेकरीताच चर्चेत आहे असेही दिसत नाही. लगतच्या गडचिरोली, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातही असाच कयास सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात शहरी तुलनेने जास्तीतजास्त मतदान झाले आहे. परिवर्तन लाटेत ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने स्वार झालेत का? हा सवाल सुद्धा चवीने चाखला जात आहे. निवडणुकीनंतर रंगलेला सट्टा वत्यावरील विश्वासार्हता पचायला जड जात असली तरी मतमोजणी होईस्तोवर या चर्चाना लगाम लावण्याचा प्रयत्नं नाहक ठरेलं कारण यात बहुमतांचा विश्वास लपलेला आहे.

संकलन :- प्रा. महेश पानसे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)