बल्लारपूर वनपरीक्षेत्र (केम)परिसरात एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, (A person died in a tiger attack in Ballarpur Forest Park (Chem) area.)
बल्लारपूर :- बामणी बेघर येथील रहिवासी श्री. दिवाकर मनोहर उमाटे, वय 56 वर्षे, धंदा मजुरी हे दिनांक 13.04.2024 ला सकाळी केम तुकुम येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. रात्र होवुनही ते घरी परत न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी दिनांक 14.03.2024 ला त्याचे कुटुंबियांनी नियतवनरक्षक केम यांना सायंकाळी 6.30 वाजता या बाबत माहिती दिली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत वनात रात्री शोधमोहीम सुरु केली. वनात श्री. दिवाकर मनोहर उमाटे यांचा शोध घेत असतांना बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र केम मधील संरक्षीत वनखंड क्रमांक 577 मध्ये त्यांचे शव आढळुन आले. मौकयावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात श्री. दिवाकर मनोहर उमाटे यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे कुटुंबियांना सानुग्रह मदत देण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर वाघाला जेरबंद करण्याकरीता दोन चमु तयार करण्यात आले असुन वाघाचे वावर क्षेत्रात 15 ट्रॅप कॅमेरे व 4 Live Camera लावुन वाघाला जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. बल्हारशाह - बामणी लगत जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments