रेल्वे प्रशासनाच्या चुकीने बल्लारशाह येथे सिमेंट नेणारी मालगाडीच्या 2 बोगी रेल्वे पटरी वरून घसरली, मात्र प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही (2 bogies of cement-carrying train derail at Ballarshah due to railway administration's mistake passenger traffic unaffected)

Vidyanshnewslive
By -
0
रेल्वे प्रशासनाच्या चुकीने बल्लारशाह येथे सिमेंट नेणारी मालगाडीच्या 2 बोगी रेल्वे पटरी वरून घसरली, मात्र प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही (2 bogies of cement-carrying train derail at Ballarshah due to railway administration's mistake passenger traffic unaffected)
बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्म क्रमांक 6 वरून बल्लारशाह ते नागपूर मार्गे सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी 12:15 वाजताच्या सुमारास रेल्वे मार्गांवरून घसरल्याचे वृत्त मिळत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहिती नुसार आज सकाळच्या सुमारास सदर अपघात घडला असून मालगाडी च्या 2 बोगी घसरल्या असून प्रत्यक्ष दर्शीच्या माहिती नुसार रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून अर्धवट मालगाडी ही नागपूर मार्गाने जाऊन सुरक्षित ठिकाणी उभी करण्यात येणार असल्याचे वृत्त असून या अपघातयामुळे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे कार्य रेल्वे विभागाने युद्ध पातळीवर सुरु केले असून या घटनेत कोणतीही हानी झाल्याची माहिती आहे.
               बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी 12:15 वाजता अहमदनगरच्या दिशेने जात असताना जी-13 क्रमांकाची मालगाडी स्टेशन यार्डातून बाहेर पडताच अचानक रुळावरून घसरल्याने मोठा अपघात टळला. त्यानुसार नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी सुरू होताच मोठा आवाज झाल्याने सर्वत्र घबराट पसरली होती. ही गाडी मंद गतीने रुळावरून घसरली होती. या घटनेमुळे प्रवासी गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नसून दहा ते बारा तासांनंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)