महाकाली यात्रेकरूसाठी मुस्लिम बांधवाचे मदरसा ठरले आश्रयस्थान, आ. किशोर जोरगेवार व प्रशासनाच्या समन्वयातुन भोजनाची व राहण्याची सोय उपलब्ध झाली (Madrasa of a Muslim brother became a shelter for Mahakali pilgrims. Food and lodging facilities were made available through the coordination of Kishore Jorgewar and the administration)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर - चंद्रपूर शहरात दि.२२ एप्रिल २०२४  रोजी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महाकाली देवी च्या यात्रेसाठी विविध जिल्ह्यातून व पर राज्यातून भावीक दर्शनाला येतात मात्र 22 ला आलेल्या संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्यानंतर महाकाली यात्रेकरूंची तारांबळ उडाली मात्र वेळीच आ. किशोर जोरगेवार व प्रशासनाच्या समन्व्यतून चंद्रपूर शहरातील मुस्लिम बांधवाच्या मदरसा मध्ये यात्रेकरूंची राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली तर दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सदर घटनेची माहिती मनपा प्रशासनास कळताच तातडीने कोसळलेली झाडे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून अधिकांश परिसर रहदारीस मोकळा करण्यात आला आहे. सोमवारला आलेल्या वादळात शहरातील तुकूम, बंगाली कॅम्प, रयतवारी कॉलोनी, हवेली गार्डन छत्रपती नगर, वडगाव, सरकार नगर इत्यादी परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवित हानी अथवा कुणी जखमी होण्याची घटना घडली नाही. अनेक जागी झाडे पडल्याने रहदारीस अडथळा होईल हे लक्षात घेता मनपा अग्निशमन विभाग, उद्यान विभाग व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे सदर झाडे हटविण्याची मोहीम रात्रीच हाती घेण्यात आली शहराच्या विविध भागातील १५ ते १६ कोसळलेली झाडे हटवुन रात्रीच रस्ता मोकळा करण्यात आला तर उर्वरीत ठिकाणची झाडे हटविण्याचे काम सुरु आहे. काल आलेल्या वादळात वाहणारे वारे हे अत्याधिक गतीने वाहत होते तसेच पावसाचाही जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी नागरीकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)