वृत्तसेवा :- ज्या गोष्टीची भीती अनेक जण व्यक्त करीत आहेत, ती गोष्ट आता सुरत लोकसभा क्षेत्रातील अविरोध निवडीने प्रत्यक्ष होताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो), अमेरिका, ग्रेट ब्रिटन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भारतीय लोकशाहीवर चिंता व्यक्त केली आहे. त्याची जाणीव न ठेवता स्वत:ला गांधीवादी, आंबेडकरवादी म्हणवणारे जातीच्या राजकारणा पलीकडे जाताना दिसत नाही. विवेक गमावलेल्या लोकांना गुलामगिरी शिवाय पर्याय राहणार नाही, हे सुरतमधील अविरोध निवडीने सिद्ध केले आहे. सर्व भारतीयांचे अभिनंदन ! ३७ टक्के लोकांचा धार्मिक उन्माद आणि ६३ टक्के लोकांच्या उदासिनतेमुळे भारत देशात नवीन शासन प्रणाली लागू करण्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरतमध्ये यशस्वी झाला आहे. म. गांधी व पंडीत नेहरू यांनी भारताला दिलेली ‘लोकशाही’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले ‘संविधान’ नष्ट करण्यात सुरत प्रकल्पात यश आले आहे. आपण जात, धर्म, महापुरूष, पक्ष, प्रदेश, विचार, भाषा यामुळे एकत्र येऊन एक निर्णय घेऊ शकत नसल्याने देशात हुकूमशाही लागू करण्याचा प्रकल्प यशस्वी ठरला आहे. त्यामध्ये आपण सर्व देशवासीयांचा सहभाग असल्यामुळे त्या यशाचे श्रेय सर्वांना जाते.
हा पथदर्शी प्रकल्प भाजपचे शहेनशाह -ए-आलम नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याची आर्थिक राजधानी सुरतमध्ये राबविला. तो प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता हा प्रकल्प भारतभरातील उर्वरित ५४२ लोकसभा क्षेत्रात लागू करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही लोक त्याला ‘पुतीन पॅटर्न’देखील म्हणतात. ब्लादमीर पुतीन यांनी रशियातील सर्व विरोधकांना निष्प्रभ करून प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली आहे. सुरत पॅटर्नमध्ये निवडणूक घेण्याची गरजच पडू देण्यात आलेली नाही. भारताच्या शहेनशाहनी पुतीनपेक्षाही श्रेष्ठ कामगिरी बजावली आहे. आपले शहेनशाह विश्वगुरू आहेत. सुरतमध्ये विरोधकांचे अर्ज रद्द करणे किंवा त्यांना धमक्या देऊन अर्ज मागे घेण्यास बाध्य करण्यात आले. सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्याकरिता कुंभाणी यांच्या नामांकन अर्जावरील चार अनुमोदकांनी आपण स्वाक्षर्याच केल्या नसल्याचे निवडणूक अधिकार्याला सांगितले. एवढी निष्पक्ष निवडणूक रशियाचे हुकूमशहा ब्लादमीर पुतीनदेखील घेऊ शकलेले नाहीत. अधिकृत उमेदवाराचा अर्ज रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या डमी उमेदवाराचाही उमेदवारी अर्ज असाच रद्द करण्यात आला. बीएसपीचे उमेदवार प्यारेलाल भारती २४ तास बेपत्ता होते. ते अखेरच्या दिवशी थेट निवडणूक अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. याच प्रकारे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित आठ अपक्ष उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिले. राहुल गांधी आतापर्यंत ही लोकसभा निवडणूक शेवटची असल्याचा आरोप करीत होते. तो आरोप सुरत प्रोजेक्टमध्ये सिद्ध करून दाखविण्यात आला आहे. या पद्धतीने सुरतचा हुकूमशाही पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर हा प्रायलट प्रोजेक्ट देशभर राबविण्यास कोणाचीही हरकत राहणार नाही. मला माझी जात दुसर्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि माझा धर्म महान आहे. माझ्या जात आणि धर्मापुढे लोकशाही, स्वातंत्र्य, बुंधत्व तथा संविधानाचे काहीही महत्त्व नाही, हे माझे दुर्दैव म्हणा तर. काही ओबीसी, मराठ्यांना अॅट्रॉसिटी कायद्याची भीती दिसत आहे, तर काही बौद्धांना काँग्रेसचे दलाल, काँग्रेसी हरिजन दिसत आहेत. हे सर्वजण १९५०, १९८० मधील दुर्घटनाच्या इतिहासातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. हे लोक एकतर अडाणचोट असावेत किंवा भ्रमिष्ट असावेत. या दोन्ही येळपट लोकांना त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ पाहात आहे, हे दिसत नाही. अफगाणिस्तानच्या तालिबानी, सिरियातील इसिसच्या किंवा रशियातील पुतीन राजवटीचा अनुभव आल्याशिवाय या अडाणचोट लोकांचे टाळकं ठिकाणावर येण्याची शक्यता दिसत नाही. पुतीनसारखी राजवट कार्यरत झाल्यावर लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कुठून आणणार, हे या भाबड्या लोकांना माहिती नाही.
संकलन :- डॉ. मिलिंद कीर्ती, नागपूर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या