बल्लारपुरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या (Isma committed suicide by hanging herself in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपुरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या (Isma committed suicide by hanging herself in Ballarpur)
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गौरक्षण वार्डात किरायाच्या घरी राहणाऱ्या एका इसमाने कुटुंबीय बाहेर गावी गेल्याची संधी साधून आपल्या राहत्या घरीच दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल बुधवार दि. ३ रोजी दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान घडली. मृतक इसमाचे नाव प्रमोद देवराव चनोले (३५) रा. गौरक्षण वार्ड बल्लारपूर असे असून. बल्लारपूर येथील गौरक्षण वार्डातील रवींद्र मेश्राम यांच्या घरी प्रमोद चनोले हा कुटुंबासह राहत होता. तो एका गॅरेज मध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अशातच त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होता. याला कंटाळून पत्नी काही दिवसापासून माहेरी गेली होती. पती प्रमोद मध्ये सुधारणा होऊन चांगली वागणूक देणार म्हणून ती घरी येत होती. मात्र त्याचे दारूचे व्यसन कमी होत नव्हते. प्रमोदचे कुटुंबीय नागभीड येथील लग्न समारंभाला गेले होते. हिच संधी साधून त्याने घरातील स्टूलच्या साहाय्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून त्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)