हिंदू कोड बिल हे स्त्रियांच्या उद्धाराच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे राष्ट्रीय पाऊल - डॉ. मृदुला जांगळेकर (The Hindu Code Bill is an important national step for the salvation of women - Dr. Mridula Janglekar)
महात्मा फुले महाविद्यालयात व्याख्यानमाले अंतर्गत दुसऱ्या विचार पुष्पाचे आयोजन
बल्लारपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत देशाविषयी अभिमान होता. भारत शब्दाबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते. त्यांनी काढलेल्या पाक्षिकाचे नाव 'बहिष्कृत भारत' आणि मुद्रणालयाचे नाव ' भारत भूषण प्रिंटिंग प्रेस' असे होते. त्यांच्या ग्रंथरचनेत, पत्रकारितेत आणि भाषणात भारत देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता व अस्मिता भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही कारण राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम हे त्यांच्या जीवन कार्याचे अतूट अंग होते.
स्वतंत्र भारत हे मजबूत, सबळ आणि प्रगत झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी देशाची एकता आणि एकात्मतेसाठी सतत प्रयत्न केले असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ 'राष्ट्रप्रेमी डॉ. आंबेडकर' या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मृदुला जांगळेकर, (डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर), डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. ललित गेडाम यांची विचारपीठावर उपस्थिती होती यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना संविधानिक हमी मिळवून दिली आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतूदी केल्या हे कोणीही नाकारू शकत नाही. बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांना संवैधानिक हमी देणे हे त्याचे एक राष्ट्रीय कार्य होय.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. मृदुला जांगळेकर , डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर ह्या होत्या. त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत राजकीय स्वातंत्र्याठी आवाज उठविला. इंग्रजांनी भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करावे ही त्यांची मागणी राष्ट्राच्या अभिमानापोटी होती. त्यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे स्त्रियांच्या उद्धाराच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे राष्ट्रीय पाऊल होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्नील बोबडे यांनी तर आभार प्रा. ललित गेडाम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रंथालय विभागाच्या वतीने " ग्रंथ प्रदर्शनीचे " आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या