बल्लारपूर :- पोलीस स्टेशन बल्लारपूर च्या वतीने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने काल दिनांक 10/03/2024 बुधवार रोजी रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी सण उत्सव निमित्त पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून रूट मार्च काढण्यात आला सदर मार्च पोलीस स्टेशन गोल पुलिया, आंबेडकर वार्ड, वेकोली काटा गेट रोड, म.गांधी चौक, जामा मस्जिद चौक, आसमा चौक, सातनल चौक, मदिना मस्जिद , वेकोली काटा गेट, ते परत गोल पुलिया, पोलीस स्टेशन, बल्लारपूर पर्यंत कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टिकोनातून रूट मार्च दुपारी 12/00 वा.ते 13/00 वा.पर्यन्त घेण्यात आला. सदर रूट मार्च करिता 06 पोलीस अधिकारी , 40 पोलीस अंमलदार, होमगार्ड पुरुष 22, महिला होमगार्ड 03 हजर होते. अशी माहिती श्री असिफराजा शेख, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या