बल्लारपूर - एकोनिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. याच शतकात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे करण्याचा विचार सर्वप्रथम मांडला. ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते समाजसुधारक होते. भारतीय समाजाच्या दाहक
वास्तवातून त्यांचा सामाजिक विचार उभा राहिला. त्यांनी समाजपरिवर्तनाचा विचार प्रभावी केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रिशिक्षण, केशवपण बंदी, अशपृष्यता निवारण, स्त्रि- पुरुष समानता, बालविवाह बंदी, विधवा विवाहाचा पुरष्कार, अंधश्रद्धा - अज्ञानाचा विरोध, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक इत्यादी कार्यासाठी खर्ची घातले. त्यांचे हे कार्य राष्ट्र उभारणीच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले.
स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी स्थानावरुन म्हणून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, महात्मा फुलेंच्या विचारांचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे विचार वैयक्तिक आणि समजजीवनात अंमलात आणण्याची गरज आहे. वास्तव जीवनात जर त्यांच्या विचारांकडे डोळेझाक केले तर तो आपला आत्मघातकीपणा ठरेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रकाश मेश्राम यांनी तर आभार डॉ. किशोर चौरे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. रजत मंडल, डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments