बल्लारपूर पोलिसांची कारवाई, जवळपास 7,70,000 /-:रु चा दारुसाठा जप्त (Action by Ballarpur Police, Liquor stock worth around Rs.7,70,000/- seized)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, जवळपास 7,70,000 /-:रु चा दारुसाठा जप्त (Action by Ballarpur Police, Liquor stock worth around Rs.7,70,000/- seized)
बल्लारपूर :- बल्लारपुर येथे लाखोचा दारुचा मुद्देमाल वाहतुक करित असतांना पकडला उल्लेखनीय कामगिरी अशी की, प्रोव्हिशन रेड कामी पेट्रोलिंग करित असता दरम्यान बल्लारपुर पोलीसांना दिनांक -२७/०४/२०२४ चे रात्री २१/०० वा. च विसापुर रोड वर किल्ला वॉर्ड बल्लारपुर येथे रेड केली आहे. एकुण १५ पेट्या रॉयल स्ट्रॅग १८० एम.एल., ५ पेट्या रॉयल स्ट्रॅग ९० एम.एल., १० पेट्या रॉयल स्ट्रॅग ३७५ एम.एल., ३ पेट्या रॉयल स्ट्रॅग १ लिटर, ५ पेट्या रॉयल स्ट्रॅग २ लिटर व म्यागन्म बिअर ५ पेटी ६५० एम.एल. व ५ पेटया आय.बी.१८० एम.एल. असे एकुण ४८ पेट्या दारुचा माल कि.अं.३,७०,०००/-रु. व टाटा एस गाडी क्रं. एम.एच.३४ ए.बी. ५८०१ कि.अं.४,००,०००/-रु. असा एकुण- ७,७०,०००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपी नामे -१) राकेश अरुण मामेडवार वय-३७ वर्षे रा. बाबुपेठ नेताजी चौक चंद्रपुर जि. चंद्रपुर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पोहवा. संतोष दंडेवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, आंनद परचाके, सुनिल कामटकर, पो.अं. शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)