लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडणार, महाराष्ट्रातील 8 जागासह देशभरातील 88 जागावर होणार मतदान (The second phase of the Lok Sabha elections will be held on April 26. Voting will be held in 88 seats across the country, including 8 seats in Maharashtra.)

Vidyanshnewslive
By -
0
लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडणार, महाराष्ट्रातील 8 जागासह देशभरातील 88 जागावर होणार मतदान (The second phase of the Lok Sabha elections will be held on April 26. Voting will be held in 88 seats across the country, including 8 seats in Maharashtra.)
वृत्तसेवा :- देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 19 एप्रिल रोजी 102 जागांसाठी मतदान पार पडले. यानंतर आता येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. यात राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल, ओम बिर्ला, हेमा मालिनी, एचडी कुमारस्वामी, अरुण गोविल आणि प्रल्हाद जोशी असे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. या 20 जागांपैकी एक जागा वायनाड आहे, जिथून काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये त्यांनी 4,31,770 मतांनी निवडणूक जिंकली. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील एकूण 88 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.
             केरळमधील तिरुअनंतपुरम ही जागा दुसऱ्या टप्प्यातील सर्वात हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. येथे एका बाजूला भाजपकडून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर निवडणूक रिंगणात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर लढत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल यूपी मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, 12 राज्यांतील 88 जागांवर 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडच्या राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. तर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी कर्नाटकच्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर काँग्रेसचे व्यंकटरमण गौडा त्यांना आव्हान देणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)