युजीसी नेट- 2024 परीक्षेचे येत्या 16 जूनला, 10 मे पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन (Application for UGC NET-2024 Examination on 16th June, 10th May

Vidyanshnewslive
By -
0
युजीसी नेट- 2024 परीक्षेचे येत्या 16 जूनला, 10 मे पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन (Application for UGC NET-2024 Examination on 16th June, 10th May)
वृत्तसेवा :- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी युजीसी नेट- 2024 परीक्षेचे येत्या 16 जून राेजी आयाेजन करण्यात आले आहे. युजीसी- नेट जून 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून विद्यार्थ्यांना 10 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. जून मध्ये हाेणाऱ्या नेट परीक्षेसाठी 10 मे पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतील. 12 मे पर्यंत परीक्षा शुल्क भरणे तसेच 13 ते 15 मे या कालावधीत अर्जामध्ये दुरूस्ती करता येणार आहे. 16 जुन राेजी परीक्षा हाेणार आहे. अर्ज भरणे तसेच परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या www.ugcnet.nta.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी. ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. तसेच युजीसीने जुन 2024 पासून विविध 83 विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)