सात बारावर (७/१२) झालेल्या चुकांची दुरुस्ती कशी करावी ? (How to correct mistakes made on seven twelve (7/12)?)

Vidyanshnewslive
By -
0
सात बारावर (७/१२) झालेल्या चुकांची दुरुस्ती कशी करावी ? (How to correct mistakes made on seven twelve (7/12)?)
वृत्तसेवा :- सात-बारा उताऱ्यावर झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 अंतर्गत चूक दुरूस्ती साठीचा अर्ज या कलमान्वये दाखल करावा लागतो. हा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला आपली जमीन ज्या तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात येते त्याच तहसील कार्यालयत मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे तो अर्ज दाखल करावा लागतो. आपल्या जमीन संबंधित तलाठी यांच्याकडे नाही.
कोणत्या दुरुस्त्या मागता -
१) फेरफार सदरी एखाद्या वारसाचे नाव नोंदविले असेल. परंतु सात बारा सदरी नोंदविण्याचे राहून जाते तसेच जमीन क्षेत्रफळ बाबत. भुधारकाचे नाव संदर्भात.
२). काही नावे कमी करण्याचा आदेश झालेला असेल पण ती नावे उताऱ्यावरून कमी झालेली नसतील तर
३). काही जमिनीचा 32 ग झालेला असून देखील तरी मालकांची नावे सात बारा सदरी तशीच राहून गेलेली असतात.
४). एखादावेळेस पाण्याची पाळी / हिस्सा नोंदवण्याची राहून जाते.
५). एखादा शेरा किंवा एखाद्या धारकाचे नाव लिहिण्याचे राहून गेले असेल तर.
६) सात-बारा उताऱ्याचे दर दहा वर्षांनी पुनर्लेखन करण्यात येते. असे पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या धारकाचे नाव लिहायचे राहून गेले असेल तर या प्रकारे झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी या कलामान्वये अर्ज करता येतो
अश्या प्रकारची लिहिण्यात चूक असेल तरच या कायद्यांतर्गत अर्ज दाखल करता येतो. इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे, या चुका क्लेरिकल मिस्टेक म्हणजेच लिहिण्यात झालेली चूक असेल तरच तुम्हाला या कलमानव्ये अर्ज दाखल करता येतो. तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्या अर्जाला केस क्रमांक पडतो,
       तहसीलदार हे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार तलाठ्याला देत असतात. याकामी तहसील कार्यालय संबधित तलाठ्यांकडून अहवाल मागवतात चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी म्हणजेच त्या गट क्रमांक मधील सहधारक व शेतकरी खातेदार यांना नोटीस काढून अर्जदार व सहधारक यांना त्यांचे म्हणने नोंदवण्याची संधी दिली जाते नंतर योग्य ती न्यायिक कार्यवाही पार पडल्यानंतर तहसीलदार साहेब योग्य तो आदेश पारित करतात प्रस्तुतच्या आदेशाची तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाते. जेव्हा तुम्हाला तुमच्या लिखित आणि ऑनलाईन सातबाऱ्यात काही चूक आढळून आल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन घरबसल्या ई-हक्क प्रणाली द्वारे अर्ज करू शकता. ज्याची वेबसाईट ही pdeigr.maharashtra.gov.in ही आहे.

संकलन :- अड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे, कायदेअभ्यासक तथा प्रमाणित पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई मो.न. 9970013343

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)