" निर्भय बनो " या कार्यक्रमाला जातांना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला (Senior journalist Nikhil Wagle was fatally attacked on his way to the Nirbhay Bano program)

Vidyanshnewslive
By -
0
" निर्भय बनो " या कार्यक्रमाला जातांना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला (Senior journalist Nikhil Wagle was fatally attacked on his way to the Nirbhay Bano program)
पुणे :- शिक्षणाच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमाला जात असताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह ऍड.असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, महिला वकील आणि चालक यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला हे भ्याडपणाचे लक्षण असून हल्ला करणाऱ्यांची कृती निषेधार्ह आहे. जेष्ठ पत्रकार वागळे यांना ऍड.असीम सरोदे यांच्या घरी पोलीस क्लिअरन्ससाठी तीन तास अडवून ठेवले होते. नंतर संध्याकाळी ६ वाजता वागळे यांनी पोलीसांना सांगितलं की एकतर आम्हाला अटक करा, नाहीतर सभेला जाऊ द्या. त्यानंतर वागळे गाडीत बसले. त्यांच्या एका बाजूला ऍड.असीम सरोदे आणि एका बाजूला विश्वंभर चौधरी होते. गाडी पुढे गेल्यानंतर पहिला हल्ला प्रभात रोड येथील इराणी कॅफेजवळ झाला. मोटार सायकलवर आलेल्यांनी त्यांच्या रस्त्यावरच्या साथीदारांनी गाडीवर दगड आणि अंडी फेकली. थोडे पुढे म्हणजे प्रभात रोड जिथं कर्वे रोडला जोडतो तिथं आणखी २५-३० उभे होते. त्यांनी कार अडवून गाडीवर काठ्या आणि राॅड मारत काचा फोडायला सुरूवात केली. त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर हल्ला झाला. पुढे दांडेकर पुलाच्या सिग्नलला मोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून हे राजकीय पक्षाचे काही गुंड प्रवृत्तीचे राॅड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. ऍड.असीम सरोदे यांनी वागळे यांचे डोके खाली धरून ठेवल्याने इजा झाली नसल्याचे वागळे यांनी देखील सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसाढवळ्या खुनाचे प्रकार वाढले आहेत. यावर आळा घालायला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. कालचा हल्ला भीती घालण्यासाठी असला तरी त्यामुळे लोकशाही बचावासाठीची लढाई आणखीन बळकट होईल. तसेच कायदा सुव्यस्था सुरळीत ठेवता न आल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी केली यांनी केली आहे. या हल्ल्या प्रकरणी 10 आरोपीना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)