मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने बल्लारपूरात सांस्कृतिक महोत्सवाच आयोजन, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे (On the occasion of Matoshree Ramai Ambedkar Jayanti, a cultural festival was organized in Ballarpur, various educational programs were organized.)

Vidyanshnewslive
By -
0
मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने बल्लारपूरात सांस्कृतिक महोत्सवाच आयोजन, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे (On the occasion of Matoshree Ramai Ambedkar Jayanti, a cultural festival was organized in Ballarpur, various educational programs were organized.)
बल्लारपूर :- मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्त बल्लारपूरातील विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बल्लारपूरात 5 फरवरी ते 11 फरवरी 2024 पर्यंत मातोश्री रमाई जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
         या अंतर्गत मातोश्री रमाई जयंती विचार संवर्धन समिती बल्लारपूर च्या माध्यमातून अवित्तम बौद्ध मंडळ, सावित्रीबाई फुले चौक विद्यानगर वॉर्ड बल्लारपूर द्वारे 5 फरवरी ते 7 फरवरी पर्यंत तीन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पाली विद्यालय बल्लारपूरच्या वतीने 8 फरवरीला बेघर जनकल्याण सोसायटीच्या पटांगणात रमाई जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे.
             तसेच बल्लारपूरातील संपूर्ण युवक व युवतींनी एकत्र येत मातोश्री रमाई आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शगुन लॉन समोरील पटांगणात करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीला रॅली चे आयोजन व मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच १० फेब्रुवारी ला सकाळी ६ वाजता महिलांचे मॅरेथॉन स्पर्धा आणि महिलांचे भव्य कबड्डी व खो - खो चे सामने आयोजित केलेले आहेत, सायंकाळी ७ वा. अभिनेत्री प्रियंका उबाळे परभणी यांचा रडणारी नाही तर लढणारी रमाबाई व्हा यांचा रमाई यांच्या जीवनावर आधारीत पहिल्यांदाच पडद्यावर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी ला सायंकाळी ६ वा सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक युवक युवती द्वारे प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)