प्रा. महेश पानसे यांचा अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा ३ फेब्रु.ला मूल येथे (Abhishta Chintan and Gaurav Sohla of Prof Mahesh Panse on 3rd Feb at Mul)

Vidyanshnewslive
By -
0
प्रा. महेश पानसे यांचा अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा ३ फेब्रु.ला मूल येथे (Abhishta Chintan and Gaurav Sohla of Prof Mahesh Panse on 3rd Feb at Mul)
मूल :- महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष, जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे यांचे जन्मदिनी अभीष्ट चिंतन व याचे औचित्य साधून कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा दि.३ फेब्रु. २०२४ ला राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा मूल तर्फे आयोजित करण्यात आला आहे. राज्यात पत्रकार संघाचे  विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचा वाढदिवस दरवषीं चंदपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा जिल्हयातील तालुका शाखातर्फे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात  येत असतो. मूल तालुका शाखेने यंदा रूग्णांना फळे वाटप, वनीकरण, गरीब विदयार्थी यांना ब्लॅंकेट वाटप यासोबतच अभीष्ट चिंतन सोहळा व कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका अध्यक्ष सतिष राजूरवार व
जिल्हा पदाधिकारी मनिष रक्षमवार यांनी दिली आहे.
               तहसिलदार डॉ. रविन्द्र होळी, उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, प्राचार्य अशोक झाडें, जेष्ठ पत्रकार बाळूभाऊ भोयर, राजुरी स्टील इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष सुमित खेमका, युवा सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील यांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमास विशेष उपस्थितीत राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रूपराज वाकोडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी चंदपूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती चंदपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी दिली आहे. सदर सोहळा एम.आय.डि.सी. परिसर मूल येथील स्टार हॉटेल येथे दुपारी २ वाजता पार पडणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)