बल्लारपूर पेपरमिलच्या मागील परिसरात जखमी अवस्थेत बिबट्या आढळला, वनविभागाच्या माध्यमातून उपचार केले (Injured leopard found in back area of Ballarpur Paper Mill, treated through forest department)
बल्लारपूर - विसापुर मार्ग पेपर मील मागील परिसरात दिनांक 17.02.2024 ला दुपारी 2.00 वाजताचे सुमारास बिबट वन्यप्राणी जखमी अवस्थेत नाल्याशेजारी बसुन असल्याबाबत माहिती श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले.
मौकयावर प्राथमिक पहाणी केली असता सदर बिबट वन्यप्राणी जखमी असल्याचे दिसुन आले. त्यानंतर बिबट या वन्यप्राण्यास बेशुध्द करुन रेस्क्यु करण्यात आले. रेस्क्यु नंतर सदर वन्यप्राण्याची श्री. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांनी तपासणी केली असता बिबट हा नर असुन त्याचे वय अंदाजे 3 वर्षे इतके होते. तो जखमी असल्याने त्याला पुढील उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. त्याचेवर श्री. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी हे उपचार करीत आहे. श्रीमती. स्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात श्री. आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सदर मोहीम यशस्वी करण्याकरीता श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री.के.एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, वनरक्षक कु. वर्षा पिपरे, कु.उषा घोडवे, श्री.एस.एम.बोकडे, श्री. आर. एस. दुर्योधन व अति शिघ्र दल, चंद्रपुर येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या