चंद्रपूर जिल्ह्यात हत्यांचे सत्र सुरूच आतापर्यंत 4 हत्या, चंद्रपुरातील अष्टभुजा येथे युवकाची धारदार शस्त्राने हत्या ! (Session of killings continues in Chandrapur district so far 4 murders, youth killed with sharp weapons at Ashtabhuja in Chandrapur !)
चंद्रपूर :- मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे, ब्रह्मपुरी, गोंडपीपरी, बल्लारपूर नंतर आता चंद्रपुर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्येची घटना उघडकीस आली. मृतक व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते, 16 फेब्रुवारी रोजी रात्री मृतक सुरजसिंह कुंवर हा आपल्या मित्रांसोबत दारूची पार्टी करीत होता, त्या दरम्यान आपसात त्यांचा वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले व त्यांनतर आरोपीनी धारधार शस्त्राने सूरज ची हत्या केली अष्टभुजा वार्ड येथे राहणारा 25 वर्षीय सुरजसिंह कुंवर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हत्या केल्यावर आरोपीनी सूरज चा मृतदेह अष्टभुजा येथील मनपाच्या डम्पिंग यार्ड येथे कचऱ्याच्या खड्ड्यात टाकला, जेणेकरून कुणाला मृतदेह मिळणार नाही. रामनगर पोलीस तात्काळ अष्टभुजा येथे दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला असता सुरजसिंह हा सकाळपासून दिसला नसल्याचे आढळून आले, सखोल व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह डम्पिंग यार्ड येथून शोधून काढला. रात्री सूरज कुणासोबत होता याबाबत माहिती काढली असता या प्रकरणात अविनाश सोनटक्के, आदर्श हलधर, धम्मदीप उर्फ राजा इंगळे व अभिषेक मेहता यांना अटक करण्यात आली.मृतक सुरजसिंह कुंवर याच्यावर चोरी व 353 चे गुन्हे दाखल आहे, तो परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याची माहिती आहे, त्या कारणावरून सूरज ची हत्या करण्यात आली असा पोलिसांनी अंदाज लावला आहे. सध्या पोलीस कारवाई सुरू आहे, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या