मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सदोष मूल्यमापन क्रॉस मूल्यमापन करण्याची मागणी (Demand for cross evaluation of flawed evaluation in Chief Minister My School Sundar School Campaign)

Vidyanshnewslive
By -
0
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सदोष मूल्यमापन क्रॉस मूल्यमापन करण्याची मागणी (Demand for cross evaluation of flawed evaluation in Chief Minister My School Sundar School Campaign)
चंद्रपूर :- 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवल्या गेला. या अभियानात उत्कृष्ट आणि आदर्श असणाऱ्या शाळांनी व तेथील शिक्षकांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला व अभियानांतर्गत सर्व उपक्रम पूर्ण केले. या अभियानाचा भाग म्हणून नागभिड तालुक्यातील नेवजाबाई हितकारीणी विद्यालय नवेगाव पांडव या विद्यालयाने सुद्धा मोठ्या हिरीरीने या अभियानात सहभाग घेतला. मात्र संपुर्ण जिल्ह्यात सेटींग होऊन पुरस्कार रकमेची लालसा सेटींगसाठी कारणीभूत होऊन यात चुकीचे मुल्यमापन झाल्याची ओरड सुरू झाली आहे.
नागभिड तालुक्यातील नेवजाबाई विद्यालय नवेगाव पांडव विद्यालयाचे सृजनशील व कृतिशील शिक्षक सतीश डांगे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना साकडे घालून यात गंभीरपणे लक्ष घालून क्रॉस मूल्यमापन करण्याची मांगणी केली आहे. पत्रानुसार श्री डांगे यांची अभियान प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सतिश डांगे यांनी पत्रकारांजवळ सांगितल्याप्रमाणे अत्यंत सुबकरीत्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संपूर्ण अभियानाचे नियोजन केले गेले होते. अभियान संबंधी ऑफलाईन आणि ऑनलाईन डॉक्युमेंटेशन त्यांचे सहकारी शिक्षक राहुल फटाले व शिवदास बुल्ले यांच्या सहकार्याने त्यांनी पूर्ण केले होते. यासाठी मुख्याध्यापक नरेंद्र चुर्हे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अपार मेहनत घेतली.
               मात्र या अभियानाचा केंद्रस्तरावरचा  खाजगी शाळेचा निकाल कोणत्याही अधिकाऱ्याने घोषित केला नाही. तालुकास्तरा वरच्या निकालाबाबत असेच घडले. वारंवार केंद्राच्या ग्रुप वर मेसेज टाकणारे अधिकारी केंद्रावरचा - तालुक्यावरचा निकाल व्हाट्सअप ग्रुप वर का घोषित करू शकले नाही? असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. असे असताना एकदम जिल्हा स्तरावर हा अभियान जाऊन पोहचला आणि बाहेरून बाहेरून खाजगी शाळेचा निकाल जाहीर झाला हे कळाले. आणि या निकालात ज्या ज्या शाळांबद्दल कुणालाही अपेक्षा नव्हती त्या शाळा निवडण्यात आल्या व त्यांना क्रमांक देण्यात आले. त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकामध्ये आपण कुठे कमी पडलो याची प्रचंड अस्वस्थता आहे. नागभिड तालुक्यातील ज्या शाळा नेवजाबाई हितकारिनी विद्यालय नवेगाव पांडव यांच्या समोर कोणत्याच बाबतीत पुढारलेल्या नाहीत त्या शाळा तालुकास्तरावर क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर पोहोचलेले आहेत याचा प्रचंड द्वेष, राग आणि मनस्ताप सगळीकडे व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे झालेले मूल्यमापन हे सदोष आहे असा आरोप सतिश डांगे यांनी केला आहे व तसाच सुर शिक्षणक्षेत्रात घुमत आहे असे त्यांचे म्हणणे आह  त्यामुळे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी वैयक्तिक लक्ष घालून नागभिड तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या संदर्भात प्रशासकीय समिती नेमून योग्य तो निर्णय घ्यावा व योग्य त्या शाळेला योग्य तो सन्मान द्यावा अशी विनंतीवजा तक्रार सतिश डांगे यांनी जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॉन्सन यांच्याकडे  ईमेल च्या माध्यमातून  केली आहे. त्यासोबतच ते  प्रत्यक्ष भेट घेऊन नागभिड तालुक्यात खाजगी शाळांचे पुन्हा एकदा मूल्यमापन व्हावे अशी विनंतीवजा तक्रार ते करणार आहेत त्यामुळे सीईओ जॉन्सन हे यावर काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहील. मूल तालुक्यातील अनेक शाळांची अशीच ओरड सुरू आहे हे विशेष.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)