अशोक चव्हाण झाले भाजप वासी, राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश करण्याची शक्यता? (Ashok Chavan became a BJP resident, possibility of entering Parliament through Rajya Sabha?)
मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (दि.१२) काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज (दि.१३) दुसऱ्याच दिवशी भाजपसोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यानुसार अशोक चव्हाण भाजप कार्यालयात आज अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे. यावेळी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केले. चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
काँग्रेसला रामराम केल्यानंतर पुढील ४८ तासात आपण आपली राजकीय वाटचाल स्पष्ट करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले होते. सोमवारी राजीनामा दिल्यानंतर लगेचच दुस-या दिवशी त्यांनी आपली राजकीय वाटचाल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. आज माझ्या राजकीय कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे. मी आज त्यांच्या कार्यालयात औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहे,’’ अशी घोषणा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हान यांनी यापूर्वीच केली होती. यानुसार त्यांनी आज मी १२-१२.३० च्या सुमारास माझ्या राजकीय कारकिर्दीचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही स्पष्ट केले होते. तसेच महाराष्ट्राच्या रचनात्मक विकासासाठी आम्ही काम करू अशी मला आशा आहे, असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या