छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने बल्लारपूरात 4 दिवसीय महासांस्कृतिक महोत्सव रंगणार, सांस्कृतिक कार्य विभाग व बल्लारपूर नगर परिषद यांचा संयुक्त पुढाकार (A 4-day grand cultural festival will be held in Ballarpur on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji, a joint initiative of the Department of Cultural Affairs and Ballarpur Nagar Parishad.)

Vidyanshnewslive
By -
0
छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने बल्लारपूरात 4 दिवसीय महासांस्कृतिक महोत्सव रंगणार, सांस्कृतिक कार्य विभाग व बल्लारपूर नगर परिषद यांचा संयुक्त पुढाकार (A 4-day grand cultural festival will be held in Ballarpur on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji, a joint initiative of the Department of Cultural Affairs and Ballarpur Nagar Parishad.)
बल्लारपूर :- सांस्कृतिक कार्य विभाग व बल्लारपूर नगर परिषद यांचा संयुक्त पुढाकाराने बल्लारपूरात महासांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव दि. १७, १८,१९,२० फेब्रुवारी २०२४ अश्या चार दिवस चालणार असून यामध्ये विविध रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातुन नामांकित असे शेकडो कलाकार  बल्लारपूरकरांची मने जिंकण्यासाठी येत आहे. हा महोत्सव शहरातील जुने तालुका क्रिडा संकुल गौरक्षन वॉर्ड येथे सायंकाळी ७ ते १० या वेळात होणार आहे. आयोजित कार्यक्रमाचा बल्लारपूर करांना मनमुराद आनंद घेता यावा, याकरिता बल्लारपूर नगर परिषद युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रम मोफत असून प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून पासेसची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाने केली आहे. नागरिकांनी या रंगारंग कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन बल्लारपूर  नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल वाघ यांनी केले आहे.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूरात महासांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. 
सांस्कृतिक कार्य विभाग व बल्लारपूर नगर परिषद यांचा संयुक्त विद्यमाने जुने तालुका क्रिडा संकुल गौरक्षन वॉर्ड येथे दिनांक १७, १८,१९,२० फेब्रुवारी २०२४ अश्या चार दिवस आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या स्वरसंध्या कार्यक्रमासह, वाघ नुत्य, शिव तांडव नृत्य, गर्जा महाराष्ट्र माझा, आझादी ७५ नाट्य, संस्कार भारती अश्या विविधरंगी कार्यक्रमातून या महासांस्कृतिक महोत्सवाचा बल्लारपूर करांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. कार्यक्रम निःशुल्क असले तरी गैरसोय होऊ नये यादृष्टीने नगर परिषदतर्फे योग् नियोजन करण्यात आले असून महासांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)