महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule College organized a farewell function for 12th students)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन (Mahatma Jyotiba Phule College organized a farewell function for 12th students)
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाद्वारे 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, तर प्रमुख अतिथी राजू वानखेडे सर, सहायक शिक्षक, जनता विद्यालय बल्लारपूर, तसेच संपादक (बल्लारपूर मंथन) प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. दिवाकर मोहितकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली.
         यावेळी मान्यवर अतिथीनी विद्यार्थ्यांना 12 वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतांना येणाऱ्या काळात यश प्राप्त करण्याच्या सदिच्छा दिल्या तसेच परीक्षेदरम्यान आपले आरोग्य जपण्याचाही सल्ला दिला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर चिंतन मनन केल पाहिजे तसेच परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगायला पाहिजे यामुळे सर्व जग पादाक्रांत करता येत यासोबत त्यांनी 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सदिच्छा व्यक्त केल्या. " या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)