लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांच्यासह जिल्ह्यातील अनेक तहसीलदार सवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या (In the wake of the Lok Sabha general election 2024, the transfer of officers of several tahsildar all over the district including Tahsildar Kanchan Jagtap of Ballarpur. Information of source)
चंद्रपूर :- एका मुख्याधिकाऱ्यांसह चार तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्याऐवजी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहायक आयुक्त (नगर परिषद) अजितकुमार डोके यांची बदली भंडारा जिल्ह्यात मुख्याधिकारी पदावर, तसेच पोंभुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बत्त आशिष घोडे यांची बदली भंडारा जिल्ह्यात लाखांदूर नगरपंचायत म मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली. न त्यांच्या जागेवर कुणालीही नियुक्ती - देण्यात आलेली नसल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. तहसीलदार श्रेणीत चंद्रपूरच्या तहसीलदार (संगायो) पदावर सीमा गजभिये यांची नियुक्ती झाली आहे. मूलचे तहसीलदार रवींद्र होळी यांची बदली आमगाव (जि. गोंदिया) येथे करण्यात आली. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मृदृला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांची बदली हिंगणा (जि. नागपूर) व बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांची नागपूर येथे बदली झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. भिसीच्या अपर तहसीलदारांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली झाली. ही जागाही रिक्त झाली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रिया कवळे यांची तहसीलदार (सामान्य) जिल्हाधिकारी कार्यालय येथे बदली करण्यात आली. आशिष वानखेडे यांची जिवती तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. ते नागपूर येथील आयुक्त कार्यालयात होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या