स्त्री शिक्षणाबरोबर समाज सुधारणेचे महान कार्याच प्रतिक म्हणजे सावित्रीबाई फुले - प्रा. सविता पवार Savitribai Phule - is the symbol of the great work of social reform along with women's education. Prof. Savita Pawar

Vidyanshnewslive
By -
0
स्त्री शिक्षणाबरोबर समाज सुधारणेचे महान कार्याच प्रतिक म्हणजे सावित्रीबाई फुले - प्रा. सविता पवार Savitribai Phule -  is the symbol of the great work of social reform along with women's education. Prof. Savita Pawar
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील अवित्तम बौध्द मंडळ सावित्रीबाई फुले चौक परिसरात आज स्त्री उद्धारकर्ती पहिली महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाबरोबरच समाज सुधारणेचा पुरस्कार करणारी लाखो दिन दुबळ्या पददलिताची आई सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. सविता पवार तर प्रमुख अतिथी म्हूणन डॉ. विनय कवाडे, प्रा. राजेश ब्राम्हणे, देविदास करमणकर ई ची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर शालेय विद्यार्थ्याद्वारे विविध घोषणा देत मिरवणूकिचे स्वागत करण्यात आले यानंतर प्रमुख अतिथीचे मार्गदर्शन झाले.
         यावेळी विशेष व्याख्याता व मार्गदर्शक म्हणून प्रा. सविता पवार पुढे बोलताना म्हणाल्यात की " स्त्री शिक्षणा बरोबर समाज सुधारणेचा वसा हाती घेतला पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री शिक्षणाला महत्व व प्रसंगी शेण दगड ई चा मारा सहन करून ज्ञान दानाच कार्य सावित्रीबाई फुले यांनी केल यासोबतच त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला. " यावेळी नंदाताई मुन यांनी " मी सावित्री बोलतेय " हा एकपात्री नाट्य प्रयोग सादर केला. यानंतर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)