१ फेब्रुवारीपासुन चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे "सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धेचे " आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन (Chandrapur Municipal Corporation organizes "Beautiful Home Garden Competition" from February 1, appeals to citizens to participate)

Vidyanshnewslive
By -
0
१ फेब्रुवारीपासुन चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे  "सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धेचे " आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन (Chandrapur Municipal Corporation organizes "Beautiful Home Garden Competition" from February 1, appeals to citizens to participate)
चंद्रपूर   - चंद्रपूर महानगरपालिके तर्फे माझी वसुंधरा व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहर सुंदर व हरित करण्यासाठी माझे योगदान या थीमवर  सुंदर माझी घरगुती बाग स्पर्धा घेण्यात येणार असुन यात घरी छोटी बाग असणाऱ्या/ नविन बाग तयार करू इच्छिणाऱ्या तसेच टेरेस गार्डन/किचन गार्डन असणाऱ्या किंवा तयार करू इच्छिणाऱ्या स्पर्धकांना यात भाग घेता येणार आहे. स्पर्धेत टेरेस गार्डन / किचन गार्डन व माझी अंगणातील बाग असे दोन भाग असुन दोन्ही स्पर्धांना प्रत्येकी ३ रोख व १० प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. १८ तारखेपासुन स्पर्धेत भाग घेण्यास नोंदणी सुरु झाली असुन नागरिकांना या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यात ५०० स्क्वे फुटपर्यत जागेत  
 गार्डन किंवा बागेची निर्मिती करणाऱ्यांना छोट्या तर ५०० स्क्वे फुटच्या जागेस मोठ्या गटात समाविष्ट केले जाणार आहे. चंद्रपूर शहरातील वातावरण उष्ण आहे, या स्पर्धेच्या माध्यमातुन अधिकाधिक घरी बागेची निर्मिती होऊन शहरातील हरीत प्रमाण ( ग्रीन कव्हर ) वाढावे व पर्यावरणपुरक वातावरणाच्या निर्मितीत नागरिकांचा हातभार लागावा हा या स्पर्धेचा उद्देश असुन घरघुती बागेच्या निर्मितीने घराला सौंदर्य प्राप्त होण्याबरोबरच घर थंड राहण्यास देखील मदत होणार आहे.  
स्पर्धेची नोंदणी सुरु झाली असुन
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSczPHV_tPsfNPeVTXR8mPMo7LJIcsnYWKvhUgLQiM6szcMU4A/viewform 
          या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.  अधिक माहितीसाठी साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. काय आहे टेरेस गार्डन सामान्य जमिनीवर न राहता घराच्या टेरेसवर फुले किंवा भाजीपाला पिकवण्याची कला टेरेस गार्डनिंग म्हणून ओळखली जाते. टेरेस गार्डन तयार केल्याने घर थंड राहण्यास मदत होते, टेरेसवर वाढणारी सर्व झाडे सूक्ष्म वातावरण तयार करतात त्या ठिकाणचे तापमान कमी करण्यास मदत करतात  काय आहे किचन गार्डन त्याचप्रमाणे भाजीपाला आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वनस्पतींची जिथं लागवड केली जाते त्या भागाला किचन गार्डन म्हटलं जातं. घरच्या बागेत, व्हरांडय़ात, बाल्कनीत, टॅरेसवर हे किचन गार्डन आपण करू शकतो. जागा भरपूर असेल तर पालेभाज्या, कंद, शेंगा, वेली, फळझाडे, भाज्या वगैरे लावता येतात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)