राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची परभणी येथे बदली तर चंद्रपूरच्या नवीन पोलीस अधिक्षक पदी नागपूरच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती (Transfer of 44 Superintendent of Police officers in the state, Superintendent of Police Chandrapur Ravindra Singh Pardeshi transferred to Parbhani and Deputy Commissioner of Crime Branch, Nagpur, Mumakka Sudarshan appointed as new Superintendent of Police, Chandrapur.)
मुंबई :- नागपूरच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सुदर्शन हे तरुण व तडफदार अधिकारी म्हणून ओळखण्यात येतात. नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांची नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष कृती गटाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) रमेश धुमाळ यांच्याकडे नागपूर ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या असून, आज राज्यातील 44 पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षकांचाही समावेश आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोलीच्या पोलीस उप महानिरीक्षक पदी बदली झाली असून, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. बारामतीतच पूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक असलेले सध्याचे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली असून, पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. आज गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची होमगार्डच्या महासमादेशक पदी पदोन्नतीने बदली झाली असून, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदी बदली झाली आहे. बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी संजय जाधव यांची नियुक्ती झाली आहे. यापुढील काळात बारामतीचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक हे संजय जाधव असतील. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब हे संजय जाधव यांचे गाव असून त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, कोल्हापूर, तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments