शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित (Applications invited for Shiv Chhatrapati State Sports Award till January 22)

Vidyanshnewslive
By -
0
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित (Applications invited for Shiv Chhatrapati State Sports Award till January 22)
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शासनाने नुकत्याच 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहीत केलेली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षीच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू आणि महिला क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंकमध्ये उपलब्ध लिंकवर विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)