चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वेसमस्या संदर्भात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेशी चर्चा (Former Union Minister of State for Home Affairs Hansraj Ahir discussed with Union Railway Minister Ashwini Vaishnav regarding railway issue in Chandrapur district.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वेसमस्या संदर्भात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेशी चर्चा (Former Union Minister of State for Home Affairs Hansraj Ahir discussed with Union Railway Minister Ashwini Vaishnav regarding railway issue in Chandrapur district.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या व रेल्वेशी संबंधीत अन्य विषयांवर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 13 डिसेंबरला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सोयी व सुविधांबाबत होत असलेला त्रास व  गैरसोयीबाबत सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक बंगाली बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या राज्यात किंवा स्वगृही येणेजाणे करण्यास चंद्रपूर ते हावडा ही थेट गाड नसल्याने या दोन्ही जिल्ह्यातील बगाली बांधवांना नागपूर किंवा गोंदीया येथून ट्रेन पकडावी लागते त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बंगाली बांधवांकरीता चेन्नई-बिलासपूर ट्रेन नं. 22620 हावडापर्यंत विस्तारीत करण्यात यावी. किंबहूना नांदेड सांतरागाच्छी ट्रेन नं. 12767/68 चंद्रपूर वरून चालविण्यात यावी. किंवा ट्रेन नं. 11447/48 जबलपूर-हावडा ही ट्रेन बल्लारशाह पर्यंत विस्तारीत करून सदर ट्रेनचा धांबा चांदाफोर्ट स्टेशनवर देवून या समाजाला न्याय द्यावा असेही अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चेवेळी सांगीतले. या भेटीत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेविषयक अनेक महत्वपुर्ण बाबींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेप्रसंगी रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, डीआरयूसीसी सदस्य पुनम तिवारी, गौतम यादव प्रभूती उपस्थित होते. या भेटीमध्ये हंसराज अहीर यांनी काजीपेठ पुणे ट्रेन नं. 22151/52 प्रतिदीन सुरू करण्यात यावी, बल्लारशाह वरून मुंबईकरीता दररोज ट्रेन सुरू करावी. नंदीग्राम एक्सप्रेस स्ट्रे नं. 11401/402 ही गाडी आदीलाबादहून व्हाया नांदेड मुंबईला जाते ती आदीलाबाद वरून बल्लारशाहपर्यंत विस्तारीत करण्यात यावी. दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721/22 निजामुद्दीन येथून हैद्राबाद पर्यंत चालविण्यात येत आहे ही गाडी हैद्राबादला 19 तास उभी असते त्यामुळे या गाडीचे सोलापूरपर्यंत विस्तारीकरण केल्यास नागपूर वर्धा, चंद्रपूर, वर्धा, बल्लारशाह, कागजनगर, मंचेरीयल, रामगुंडम, काजीपेठ जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना चांगली सुविधा होईल असेही अहीर यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बल्लारपूर पिटलाईनचे काम पुर्ण झाल्याने चंद्रपूर व विदर्भातील रेल्वे प्रवास्यांना रेल्वेच्या मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यास रेल्वे प्रशासनास मोठा वाव असल्याचे हंसराज अहीर यांनी चर्चेदरम्यान मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबतची सदर भेट अत्यंत फलदायी झाली असून रेल्वेमंत्र्यांनी येत्या महिनाभरात या सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेऊ असे अहीर यांना आश्वासीत केले. यावेळी श्री. मौर्या रेल्वे बोर्ड सदस्य तथा कार्यकारी निदेशक कोचिन हे सुध्दा उपस्थित होते. त्यांनीही या न्याय मागण्या संदर्भात सकारात्मक भूमिका मांडत या सर्व मागण्यांच्या पुर्ततेकरीता लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)