महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तकाच्या यात्रेत चैत्यभूमीवर यावर्षी 100 कोटींच्या वर पुस्तक विक्री झाल्याचा अंदाज (It is estimated that over 100 crores of books have been sold at Chaityabhoomi this year during the Book Yatra on the occasion of Mahaparinirvana Day.)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- " ज्ञानाच प्रतिक म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज " म्हणून ज्यांना ओळखलं जात त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात शेकडो पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. नागपूर, चंद्रपूरची दीक्षाभूमी असो वा चैत्यभूमी या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येत जनसमुदाय येत असतो. व परत जातांना पुस्तकांच्या रूपाने शिदोरी घेऊन जात असतो. विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षीचा लोकांचा पुस्तक विक्रीचा कल वाढलेला दिसला. यावर्षी पुस्तक विक्रीचा व्यवसाय 100 कोटी रु पर्यंत झाल्याचा अंदाज वर्तविण्यात  आला आहे. या पुस्तक विक्रीमध्ये " बुध्द आणि त्याचा धम्म, भारताचे संविधान, मिलिंद प्रश्न, जातक कथा, ई पुस्तकांना विशेष मागणी होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व खंड व इतर साहित्याला देखील विशेष मागणी असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)