संसदेचं विशेष अधिवेशन नव्या संसद भवनात " सेंट्रल विस्टा " मध्ये भरणार, विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती (The special session of the Parliament will be held in the new Parliament House in "Central Vista", it is reported that the leaders of the opposition parties are also invited.)

Vidyanshnewslive
By -
0

संसदेचं विशेष अधिवेशन नव्या संसद भवनात " सेंट्रल विस्टा " मध्ये भरणार, विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती (The special session of the Parliament will be held in the new Parliament House in "Central Vista", it is reported that the leaders of the opposition parties are also invited.)

वृत्तसेवा :- ऐन गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन का बोलवण्यात आले, अशी टीका विरोधकांना सुरू असताना अखेरीस केंद्र सरकारने अधिवेशनाबद्दल खुलासा केला आहे. गणेश चतुर्थीच्या पर्वावर नव्या संसदेत प्रवेश केला जाणार आहे. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर बोलावलं आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन का ठेवण्यात आले, असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. पण ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 18 तारखेला जुन्या संसद भवनामध्ये अधिवेशन सुरू होणार आहे. 19 तारखेला नव्या संसदेत होणार आहे. नव्या संसद भवन सेंट्रल विस्टाच्या उदघाटन सोहळ्याला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

         त्यासह प्रमुख विरोधी पक्षांनाही निमंत्रण दिलं जाणार आहे. असं आहे नवीन संसद भवन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं होतं. संसद भवनाच्या बांधकामासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही इमारत सुमारे 3 वर्षांत बांधली गेली. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही संसद भविष्याचा वेळ घेऊन बांधण्यात आली आहेसाडेनऊशे एकरमध्ये पसरलेल्या भारताच्या या नवीन संसद भवनाची किंमत जगातील इतर महागड्या संसदेच्या तुलनेत जवळपास 36 पटीने कमी आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या अनुक्रमे 888 आणि 384 जागा आहेत. व्हिजिटिंग गॅलरीत 336 हून अधिक लोक बसू शकतात. तसेच संयुक्त अधिवेशनात 1272 हून अधिक खासदार एकत्र बसू शकतात. दुसरीकडे संसदीय कामकाज समितीसाठी या इमारतीत स्वतंत्र कार्यालये करण्यात आली आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)